Blooming Sparkly Red Rose

Logo Design by FlamingText.com
Blogger Widgets Blogspot Tutorial

ब्लॉग तयार करायला शिका


ब्लॉग तयार करायला शिका

          आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक  नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त्‍ा वापर केला जात आहे.
            तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्‍ळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्‍र माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या  शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास 8698810529 या क्रमांकावर whatsapp messege करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्‍ा केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.

1.  सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे.

2.   त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.

3.  लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर क्लिक करावे.



 4.    खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप्‍ा करावे. 


     

    तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो          Address या रकान्यात टाईप करावा.

         जसे – www.krushnakarpe.blogspot.in

          Template  यामध्ये तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे असेल ते खाली दिलेल्या डिझाईन मधून Select करावे. व खालील Create Blog वर क्लिक करावे.

5.  आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View Blog वर क्लिक केल्यास तुम्हाला  तुमचा ब्लॉग दिसेल.



6.   खाली दिलेल्या विडोंमध्ये  View Blog शेजारील पाँइंटवर क्लिक केल्यास आपणास  Post, Pages, Layout, Templates, Setting यासारख्या अनेक ऑपशन दिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा ब्लॉग सजवू शकता.


7.   आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.